आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी स्वत; मधील सुप्त गुणांना वाव द्यावा – शिक्षणमंत्री विनोद तावडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सतिश शिंदे

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व देताना त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांनाही वाव द्यावा, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

बाल दिनाच्या निमित्ताने चर्नी रोड येथील जवाहर बाल भवन येथे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतर शालेय चित्रकला स्पर्धा बक्षिस समारंभ पार पडला. यावेळी कवी प्रशांत मोरे, मुंबई शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. तावडे म्हणाले, आजच्या काळात मुलांचा इंटरनेट, मोबाईल यामध्ये जास्त वेळ जात असला तरी आपल्या आई वडिलांशी, घरातल्या मोठ्यांशी नियमीत संवाद साधा. आपल्या पालकांना आपल्याला येणाऱ्या अडचणी, समस्या वेळोवेळी सांगणे आवश्यक आहे. मैदानी खेळ, नियमितपणे, संतुलित आहार आणि पुरेशी झोप याचा समावेश दिनक्रमामध्ये आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment