आहारात खूप महत्वपूर्ण आहे सीताफळ ; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सीताफळ हे कोणाला आवडत नाही. सगळ्यांना च आवडते. त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तसेच या फळाचं येण्याचा सीजन हा ठराविक कालावधीत येते. हे फार थंड फळ आहे. रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु काही वेळा हे जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते.

सीताफळ खाण्याचे फायदे …
सीताफळाची पाने वाटून त्यांचा रस काढावा व रसाचे थेंब नाकात टाकावेत. रुग्ण शुद्धीवर येतो. सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात तसेच त्याच्या वापराने डोक्यातील उवा व लिखाही मरून जातात. याचे सेवन हे हृद्यासाठी फायदेशीर असे आहे. पित्ताचा त्रास होत असल्यास सीताफळ खाल्ल्याने फायदा होतो. ज्या व्यक्ती शरीराने दुबळ्या किंवा किडकिडीत असतील, त्यांनी सीताफळाचे सेवन जरूर करायला हवे.

सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्या सेवनाने शरीर चांगले राहण्यास मदत होते. हे फळ जर वाढत्या वयातील मुला-मुलींना खाण्यास दिले तर त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते. अनेक वेळा महिलांना काळे, घनदाट केस असलेले आवडतात . अनेक वेळा धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात.यावर उपाय म्हणून सीताफळ खाल्ले जावे. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.केस गळती रोखण्यासाठी सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधामध्ये उगाळून लावल्यास फायदा होतो. सीताफळामध्ये भरपूर मात्रेमध्ये असणारे अ जीवनसत्व केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्याकरिता उत्तम आहे.

सीताफळाच्या बिया उगाळून लावावयाच्या झाल्यास बिया लावून डोके एखाद्या जाडसर कपड्याने बांधून टाकावे. या बिया डोळ्यांना लागू देऊ नये कारण त्यामुळे डोळ्यांची आग होण्याचा संभव असतो.स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. सीताफळाने गर्भवती महिलांच्या शरीराची झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment