कंगणा राणावत सहकुटुंब भाजपमध्ये करणार प्रवेश ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगनाचं पाली हिल इथलं तीच कार्यालय मुंबई महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली. कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद खूपच चिघळला असतानाच तिनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या वादात ओढून घेतलं. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात कंगना आणि तिचे कुटुंबीय भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वी कंगनाची आई  आशा रानौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे आभार मानले होते. ‘आम्ही सुरुवातीपासूनच काँग्रेस समर्थक आहोत हे माहीत असूनही त्यांनी आम्हाला मदत केली’ असं वक्तव्यही त्यांनी मीडियासमोर केलं. तसेच राजकारण काही कंगना आणि तिच्या कुटुंबासाठी नवीन नाही. कारण, कंगनाचे दिवंगत आजोबा सरजू राम मंडी जिल्ह्याच्या गोपाळपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते.

तिकडे भाजपही कंगणाला आणि तिच्या कुटुंबीयाना पक्षात सामील करून घेण्यास उत्सुक आहेत.गुरुवारी हिमाचल भाजपाकडून मनालीपासून १५५ किलोमीटर दूर भांबला स्थित कंगनाच्या पैतृक निवासस्थानापर्यंत एकजुटतेचा संदेश देत एका मार्चचं आयोजन केलेलं दिसलं. भाजपचं हिमाचल युनिटनं याअगोदरच रानौत कुटुंबाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment