कोल्हापुरातील 44 पर्यटक जैसलमेरला लष्कराच्या अलगीकरण कक्षात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | तेहरानमधील अडकलेले कोल्हापूर व परिसरातील ४४ पर्यटक दिल्लीमध्ये आले असून तिथे धावपट्टीच्या आवारातच तपासणी करून त्यांना जैसलमेरला लष्कराच्या अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. तिथे चौदा दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर पुन्हा तपासणी करुन घरी पाठवण्यात येणार आहे.

इराण व इराकमधील धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या व ‘करोना’मुळे तेहरानमध्ये ४४ पर्यटक अडकले होते. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, अकलूज, सोलापूर येथील पर्यटकांचा समावेश होता. त्यांना तेहरानमधून भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. गुरुवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व शनिवारी रात्री भारतात पाठविण्यात आले.

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरील धावपट्टीवरच त्यांची तपासणी करण्यात येऊन एअर इंडियाच्या तीन विमानांमधून थेट जैसलमेरला रवानगी करण्यात आली.

Leave a Comment