‘क्रिस्पी रोझ बासुंदी’ गणपती बाप्पाला नक्की आवडेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणपती बापाच्या नैवेद्यासाठी क्रिप्सी रोझ बासुंदी कशी करायची ते आज जाणून घेऊ.

साहित्य –

१ लिटर दूध, १ वाटी कणीक, १ टीस्पून साजूक तूप, रोझ सिरप, ५-६ टीस्पून साखर, तळण्याकरिता साजूक तूप आणि 2 टीस्पून बदामाची पूड

कृती –

1) प्रथम कणीक परातीत घेऊन त्यात १ टीस्पून तुपाचे मोहन करून घट्ट मळावी.

2) मग त्याच्या पुर्‍या लाटून त्यावर टोचे मारून मंद आचेवर कडक तळाव्यात.

3) त्या गार करून हातांनी पुर्‍यांचा चुरा करावा. दूध उकळायला ठेवावं. साखर आणि बदामाची पावडर, रोझ सिरप दूध घालून आटवून घ्या.

4) ते घट्टसर झाल्यावर गॅस बंद करावा. दूध थंड करून त्यात पुर्‍यांचा चुरा मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवावं.

वाटीत काढून वर ड्रायफ्रूट्सच्या कापांनी सजवून या गारेगार क्रिस्पी बासुंदीचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा.

 

Leave a Comment