देशी बियाणांची बँक स्थापन करणाऱ्या राहीबाई पोपरे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आदर्श सरपंच पोपटराव पवार, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यानंतर देशी बियाणांच जतन करून बियाण्यांची बँक स्थापन करणाऱ्या मदर ऑफ सिड म्हणजेच बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्यासह देशातील २२ कर्तृत्वान व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जैवविविधतेसाठी आदिवासी भागांमध्ये काही लोक असे बियाणे जतन करून ठेवतात. राहीबाई पोपेरे यांचे या क्षेत्रातील काम अजोड म्हणावे लागेल. त्यांचा बीबीसीने २०१८ साली जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये राहीबाईंचा समावेश केला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील “कोंभालणे” या खेडेगावातील राहीबाई पोपरे या जगाच्या पटलावर सीड मदर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख “मदर ऑफ सीड” असा केला होता. आदिवासी समाजाच्या राहीबाई निरक्षर आहेत, पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या. लहानपणापासून त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. राहीबाईंच्या वडिलांकडून त्यांना हे ज्ञान मिळाले त्यांचे वडील नेहमी म्हणायचे “जून ते सोन” त्याचा अर्थ राहीबाईंनी चांगला समजून घेतला. राहिबाईच्या आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश शेतकरी आजही पारंपारिक देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतो. सुरुवातीच्या काळात राहीबाईना हे काम करताना अनेकांनी वेड्यात काढल. राहीबाई हे काम पूर्वी छंद म्हणून करायच्या. सुरुवातीला अनेक लोकांकडून त्यांना अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागली पण त्यांनी मार्ग सोडला नाही. पारंपारिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या, शेतात त्याचा वापर करायच्या. अखेर पद्मश्री पुरस्काराने त्यांच्या या अमूल्य कामाची दखल घेतली.

Leave a Comment