“बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे” चिमुरड्याची रडत रडत देवाकडे प्रार्थना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांच्या समर्थकांना चिंता वाटत आहे. याच दरम्यान एक चिमुरडा बच्चूभाऊंसाठी प्रार्थना करताना मोठमोठ्याने रडताना दिसत आहे.

“देवा, बच्चू कडू भाऊले बरोबर निगेटिव्ह आणू दे, काहीच नको होऊ देऊ” असे हा चिमुरडा रडत देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. खुद्द बच्चू कडू यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

“बेटा मला काहीच नाही होणार, औषधीसोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही. तू रडलास, तर मला बरं वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खूप मोठा हो, सेवा कर” अशा शब्दात कडूंनी या मुलाला धीर दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment