महाविकास बजेट २०२०: दररोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचं महाविकास आघाडीचं उद्दिष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केवळ १० रुपयांत गरीब आणि गरजूंना जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेला सरकारने आर्थिक बळ दिलं आहे.

दरोरोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. शिवभोजन थाळी केंद्रांवर ५०० थाळी देण्यात येत असून त्यांची संख्या आता वाढवली जाईल. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याच पवार यांनी सांगितले. यामुळे जास्तीत-जास्त गरीब आणि गरजूंना याचा लाभ मिळणार आहे.

२६ जानेवारीला सुरवात झालेल्या  शिवभोजन योजेअतंर्गत शिवभोजन केंद्रावर प्रति व्यक्ती ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येत आहे. ही योजना सुरु झाल्यापासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद तिला मिळत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment