महिलेची धावत्या लोकलमध्ये प्रसूती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | गणेश चतुर्दशीच्या रात्री अंधेरी स्थानकात प्रवासी गर्दी नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या दोन महिला पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे धावत्या लोकलमध्ये प्रसूत झालेली महिला आणि तिच्या बाळाची प्रकृती सुखरूप असून, अंधेरीच्या जीवघेण्या गर्दीतून रेल्वे पोलिसांनी या महिलेला आणि बाळाला स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात विनाविलंब दाखल केल्याने हे शक्य झाले.

 

नालासोपारा येथील डांगेवाडी येथे राहणाऱ्या यास्मिन यांनी पती माजिद अमिरउल्ला चौधरी आणि बहीण सना शेख यांच्यासोबत रुग्णालयात जाण्यासाठी चर्चगेटला जाणारी जलद लोकल पकडली होती. मात्र, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रसूतीकळा असह्य झाल्याने यास्मिनने मुलीला जन्म दिला. धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती झाली.

 

यावेळी एका प्रवासी महिलेने ही माहिती रेल्वे पोलिसांना हेल्पलाइनच्या माध्यमातून दिली. यावेळी बंदोबस्तात असलेल्या महिला हवालदार सुरेखा कारके, सुचिता वाळवे आणि गजानन पांचाळ यांनी स्ट्रेचर आणि हमाल यांच्यासह तातडीने महिला डब्याकडे धाव घेतली. सायंकाळी मेट्रो आणि रेल्वे प्रवाशांची गर्दी होती. यावेळी पुलावरून गर्दीला बाजूला करत यास्मिन आणि बाळाला स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात आणले गेले. नवजात बाळ पाहून ड्यूटीवरील डॉक्टरांनी प्रथमोपचार करत यास्मिन आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले.

Leave a Comment