वातरोग या आजारासंबंधी असलेले समज-गैरसमज जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा वात हा फक्त म्हताऱ्या माणसांना होतो. असे समजले जाते. परंतु असे काही नाही वात हा आजाराचा प्रकार हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा आजार कोणालाही होऊ शकतो. वात या आजाराचा त्रास हा जास्तीत जास्त हिवाळ्याच्या दिवसात होतो. वातरोगावरील उपचारांमध्ये ‘गैरसमज’ हा मोठा अडथळा ठरतो. त्या अनुषंगाने वातरोगासंबंधीचे ‘समज-गैरसमज’ काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

वातरोग हा वृद्धांना होणारा आजार आहे का ? असे मुळीच नाही हा आजार कोणालाही होऊ शकतो. विविध प्रकारचे वातरोग वेगवेगळ्या वयात होऊ शकतात. लहान मुलांना जेआयए , जेडीएम , असे वातरोग होतात. तर तरुण व प्रौढ वयात संधिवात व अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा आजार निर्माण होऊ शकतो. आणि ज्येष्ठांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस व गाउटसारखे वातरोग आढळून येतात. त्यामुळे सगळ्यात जास्त काळजी हि वयस्कर व्यक्तींनी घेतली पाहिजे.

आधुनिक वातरोगशास्त्रानुसार शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. शोग्रेन सिंड्रोमसारख्या वातरोगांचा समावेश आहे.संधिवातावर कोणताही उपचार नाही , असा एक गैरसमज आहे. आधुनिक औषधांच्या साह्याने वातरोगावर उपचार होतो. त्याचप्रकारे वातरोगग्रस्त रुग्णांना सामान्य जीवनही जगता येते. व्यायाम करणे उपचारांना पूरक असले तरी वातरोग एक प्रकारचा आजार असल्यामुळे औषधोपचार करणे आवश्यक असते. औषधोपचारांसह जीवनशैलीत बदल केला, तरच फायदा होईल. केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसा नाही.या गैरसमजापोटी अनेक जण वेदना अंगावर काढतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, संधिवात शरीरातील सगळ्या अवयवांवरती प्रादुर्भाव करू शकतो आणि त्यामुळे अन्य अवयवांना हानी पोहचू शकते.

वातारोगांमध्ये डोळ्यात कोरडेपणा, फुप्फुसांना इजा होऊन श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो.आरए फॅक्टर आणि एक्स-रे तपासण्या मुख्यत्वे होत असल्या, तरी केवळ यामुळेच प्रत्येक वेळी वातरोगाचे निदान शक्य नाही. अनेक वातरोगाचे निदान शारीरिक तपासणी आणि वातरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या चाचण्यांच्या आधार घेऊन केले जाते. आधुनिक वैद्यकशास्त्रात वातरोगांवर उपचारांसाठी जी औषधे वापरली जातात, ती रोगाच्या मुळाशी काम करीत असतात. त्यामुळे औषधांचा प्रभाव सुरू होण्यास तीन ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. बारा आठवड्यांमध्ये फायदा दिसू लागतो. त्यामुळे धीर धरणे फार महत्त्वाचे आहे. वातरोग हा सामन्य आजार आहे. त्यामुळे कोणीही जास्त टेन्शन ना घेता. घरगुती पद्धतीने त्याच्यावर उपाय आणि काळजी घेतल्यास हा आजार काही प्रमाणात हा आजार कमी होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment