२०२० रक्षाबंधन स्पेशल । हे आहेत राखी बांधण्याचे मुहूर्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण म्हंटल बहीण भावाच्या आनंदाला पारावर उरत नाही. या दिवशी बहीण राखी आपल्या भावाला बांधते. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी हि भावावर असते. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा सण एकाच दिवशी साजरा केला जातो. कोकणी लोकांच्यात नारळी पौर्णिमा ला खूप महत्व दिले जाते. या वर्षीचे रक्षाबंधन हे अनोख्या मुहूर्तावर आले आहे. या वर्षी राखी बांधण्याचा मुहूर्त हा २ ऑगस्ट च्य रात्री ८ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होणार आहे. ते ३ ऑगस्ट च्या सकाळी ९ वाजुन २८ मिनिटापर्यंत भद्रा राहणार आहे. आणि ३ ऑगस्ट च्या दिवशीच सायंकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत दीर्घायु कारक आयुष्मान योग असणार आहे.

राखी बांधण्याचे हे आहेत मुहूर्त

राखी बांधण्याचे मुहूर्त- ०९:२७:३० पासून २१:११:२१ पर्यंत

रक्षा बंधन अपराह्न मुहूर्त- १३:४५:१६ पासून १६:२३:१६ पर्यंत

रक्षा बंधन प्रदोष मुहूर्त- १९:०१:१५ पासून २१:११ :२१पर्यंत

मुहूर्त अवधि- ११ वाजून ४३ मिनिट

सकाळ पासून रक्षाबंधनाचा मुहूर्त सुरु होत आहे. हा सण श्रावण महिन्यातल्या नारळ पौर्णिमा च्या दिवशी हा सण येतो.जुन्या काळामध्ये रावणाच्या बहिणीने भद्रा याला रक्षा सूत्र बांधले होते. कि ज्याणे करून रावणाचा सर्वनाश होईल या उद्देशाने बहिणीच्या सुरक्षिततेसाठी त्याने ते बंद बांधले होते. तेव्हापासून बहिणीची सुरक्षा करण्याचं काम भाऊ करतो असं मानलं जात. तेव्हापासून हा सण हिंदू संस्कृतीत परिचित झाला आहे

Leave a Comment