५० हजाराच्या गुंतवणुकीत शतावरीचे पीक लावून मिळवा लाखो रुपयांचा नफा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल हर्बल आणि सेंद्रिय वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः औषधी वनस्पती असलेल्या वस्तूची मागणी वाढत आहे. शतावरी प्राचीन काळापासून आयुर्वेद औषधीमध्ये वापरले जात आहे, आआजकाल  शतावरीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे.  तुम्हालाही औषधी वस्पतींची शेती करायची असल्यास शतावरी पीक हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात त्याची मागणी चांगली आहे, त्याचबरोबर किंमतही चांगली आहे.शतावरी पीक सुमारे दीड वर्ष म्हणजे १८ महिन्यांत तयार होते. शतावरी ही महत्त्वाची औषधी वनस्पती असून  याची लागवड ही नोव्हेंबर- डिसेंबर या दरम्यान केली जाते. बिया टोकून किंवा गड्ड्याच्या फुटव्यापासून लागवड केली जाते.

पांढरी शतावरी ४ बाय  ३ फूट आणि पिवळी शतावरी ३ बाय ३ किंवा ३ बाय ३ बाय २ फूट अंतरावार लागवड करावी. शतावरी लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, निचरा होणारी, हलकी, मध्यम रेताड, हलकी ते मध्यम जमीन निवडावी. ही वनस्पती उष्ण तसेच समतोष्ण  हवामानात चांगली वाढते. जमिनीची नांगरट करुन कुळव्याच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी.१८ महिन्याच्या कालावधीत वनस्पतीची मुळ तयार होते, त्यानंतर ती वाळवावी लागते.

औषधाची गुणवत्ता त्याच्या मुळावर अवलंबून असते, म्हणूनच त्याच्या लागवडीमध्ये कोणतेही दुर्लक्ष होऊ नये.  त्याच्या लागवडीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मुळ सुकल्यानंतर त्याचे वजन सुमारे एक तृतीयांश राहते.  म्हणजेच, जर तुम्ही शतावरीची १० क्विंटल उत्पन्न झाले सुकावल्यावर विक्री करताना ते फक्त ३ क्विंटल राहील.जर तुम्ही एक एकरात शतावरीची लागवड केली तर त्यात सुमारे २० ते ३० क्विंटल उत्पादन येऊ शकते.  याची किंमत बाजारात ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment