WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?
अमरावतीहटके

अमरावतीत अनोखी वरात,बँड बाजा सोडून, नवरदेवाने काढलि दिंडी

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

हल्ली लग्न म्हटलं की बँड बाजा, डीजे, संगीताच्या तालावर बेधुंद होऊन थिर्कणारी तरुणाई हा ट्रेंड गेल्या कित्येक वर्षांपासून शहरापासून ते अगदी ग्रामिन भागात रुजला आहे. परंतु आता ही बातमी जरा वेगळी आहे.तुम्ही नेहमी नवरदेवाची रात्रीला निघणारी वरात पाहली असेल ज्यात घोड्या वर बसलेला नवरदेव, अन त्याच्या साथिला महागडा बँड, डीजे, आकर्षक रोषणाई अन संगीतावर अंगाच पानी करून थिर्कणारी तरुणाई हे सर्व लग्न म्हटल की आलंच न राव..

पण अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील हरम गावात काल एक आगळी वेगळी, सोबतच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा सांगणा-या दिंडीत या गावातील नवरदेव दिसला.
अमरावतीच्या हरम येथील मुकुंद रामकृष्ण आकोटकर या तरुणाचा नागपूरच्या काटोल तालुक्यातील दिग्रज येथील प्रीती अर्जुन कोहळे या तरुननिशी आज विवाह होणार आहे. त्यासाठी परंपरे नुसार आज सायंकाळी नवरदेव राशी काढल्या गेला. परंतू या वरातीत डीजे नाही, ना बँड नाही, पण महाराष्ट्राची परंपरा सांगण्याऱ्या दिंडीत मोठ्या दिमाखात नवरदेव बुवा दिसले बर. आपली महाराष्ट्रीय संस्कृती आज जोपासली गेली पाहिजे हा या मागचा आकोटकर कुटुंबाचा उद्देश होता.

नवदेवाचे वडील रामकृष्ण आकोटकर हे स्वतःहा कीर्तनकार आहे. गेल्या तीस वर्षांपासून ते वारकरी संप्रदायात कार्यरत असून त्यांचीच ही संकल्पना असल्याचे नवरदेव मुकुंद सांगतो. या नवरदेवाच्या वरातीत 5 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळी सुद्धा ही आगडी वेगळी वरात पाहून आनंदी झाले अन् तेही भजन कीर्तन गाण्यात व फुगडी खेळण्यात दंग झाले होते. या वेळेस नवऱ्या मुलानेही आपल्या वरातीचा मनमुराद आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. पोटच्या मुलाची लग्नात हौस पूर्ण करण्यासाठी वडील लाखों रुपये खर्च करतात. परंतू इतर गोष्टीना फाटा देत ही आगळी वेगळी लग्नाची वरात काढल्याने ही वरात चर्चेचा विषय बनली आहे.

x Close

Like Us On Facebook

shares