‘त्या’ कुत्र्यांची हत्या करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी । ६ सप्टेंबर रोजी बुलढाण्याजवळ असलेल्या गिरडा जंगलामध्ये शेकडोंच्या संख्येत मृत कुत्र्यांना आणून टाकले होते. यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासामध्ये पोलिसांना जास्त शोधाशोध करावी लागलीच नाही. कारण आरोपी शेजारच्या जिल्ह्यातीलच निघाले. यासंदर्भात पोलिसांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून ५ जणांना अटक केली आहे.

अटक आरोपींकडे चौकशी केल्यानंतर नगरपालिके अंतर्गत कुत्र्यांना मारण्याची मोहीम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी भोकरदन येथील सिद्धेश्वर नारायण गायकवाड, अनिल वसंत गायकवाड , संतोष सीताराम शिंदे, शेख सलीम शोकात, विष्णू उर्फ बाबासाहेब सूर्यभान गायकवाड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.

त्यानंतर या आरोपींनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशाने शहरातील श्वान पकडण्याची मोहीम राबविली होती. तसेच नगरपरिषदेच्या स्वच्छता वाहनातून श्वानांना मारहाण करुन त्यांचे पाय बांधून गिरडा जंगलात आणून टाकले, अशी माहिती दिली आहे. या प्रकरणात पुढे भोकरदननगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या – 

उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी ठेवल्या होत्या या दोन अटी ; भाजप पक्ष श्रेष्ठींनी हिरवा सिंग्नल देतात राजेंनी केली पक्षांतराची घोषणा

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

पक्षाने उमेदवारी दिली तर लढेन -शिवसेना प्रवेशानंतर ‘भास्कर जाधव’ यांची प्रतिक्रिया

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

Leave a Comment