Thursday, March 30, 2023

उपनगराध्यक्षांना दम देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : निशिकांत पाटील

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी। उपनगराध्यक्ष ज्यांचे नेतृत्व मानतात त्यांच्यासमोर त्यांना मारहाण करण्यात आली. उपनगराध्यक्षांचा कार्यकर्ता हौसेराव पाटील याला त्यांच्याच केबिनमध्ये घुसून युवकांनी चोप दिला. ज्या व्यक्तीला स्वतःचे व कार्यकर्त्यांचे संरक्षण करता येत नाही. त्यांना दम देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे प्रत्त्युत्तर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

नगरपालिकेची सभा रद्द व तहकूब हा प्रशासकीय कामाचा भाग आहे. राष्ट्रवादीने सभेवर बहिष्कार घातल्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, इस्लामपूर नगरपालिकेस स्टार रेटिंगसाठी कचरामुक्त शहर याअंतर्गत केंद्र व राज्य शासनाची संयुक्त समिती शहराचे परिक्षण करण्यासाठी गुरूवार दि.19 सप्टेंबर रोजी इस्लामपूरात दाखल झाली होती. त्या समितीबरोबर मुख्याधिकारी व सर्व विभागाचे विभागप्रमुख असणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वसाधारण सभा घेणे शक्य नव्हते.

- Advertisement -

याबाबतची माहिती नगरसेवकांना मिळाल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. प्रभाग क्र.१० चे नगरसेवक कार्यक्षम आहेत. उपनगराध्यक्ष पाटील यांची बहिण शाहूनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्यांनी पाणीपुरवठा विभागात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचे निवारण करण्यात आले होते. पाणीपुरवठा विभागाचे सभापती हे राष्ट्रवादीचे विश्वनाथ डांगे हे स्वतः आहेत. त्यांच्याच सहयोगी सदस्याची तक्रार होती.

आपल्याच विभागाच्या तक्रारी प्रसिध्द माध्यमांमध्ये देतोय हे त्यांच्या लक्षात आलं नसावं. नगरपरिषदेला स्वच्छता अभियानात देशपातळीवरील पहिल्या पाच क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट पुर्ण झाल्यानंतर जवळपास 20 कोटींचे बक्षिस नगरपालिकेला प्राप्त होणार आहे. स्वच्छता अभियानामध्ये मुख्याधिकारी व सर्व विभागप्रमुख मनापासून काम करतात. तरी सर्व नगरसेवकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.