कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना देखील कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. येडियुरप्पा यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

येडियुरप्पा यांनी ट्विट करत सांगितले की, माझी कोरोनाची चाचणी पॉजिटिव्ह आली असून, आता मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये भरती झालो आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी आणि सेल्फ क्वारंटाईनमध्ये जावे.

देशातील अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत असल्याच्या समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.