परभणी दुकानाला आग; दुकान भस्मसात

0 10

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी शहरातील प्रियदर्शनी स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या ठिबक सिंचन आणि पीव्हीसी पाईप दुकानाला आज भीषण आग लागली असून या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल आहे.

सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान या दुकानाला अचानक आग लागली. त्यानंतर पाहता पाहता हे आगीने रौद्ररूप धारण केलं. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. परंतु अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

आगीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेणे बाकी असले तरी यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती परंतु आगीचे प्रचंडलोळ असल्याने या ठिकाणी मानवी मदत पोहोचू शकली नाही. दरम्यान आगीचे कारण अज्ञात आहे.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook