खुशखबर! आजपासून राज्यातील चित्रपटगृहे 100% क्षमतेने सुरू होणार

मुंबई | केंद्र शासनाने एक तारखेपासून सिनेमागृहामध्ये शंभर टक्के क्षमतेसह सिनेमा गृह चालविण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 100% बैठक क्षमतप्रमाणे चित्रपटगृह/ थिएटर्स/ मल्टिप्लेक्सला चालू करण्याची परवानगी दिली गेली आहे.

सिनेमा हे व्यवसायाचे आणि मनोरंजनाचे मोठे साधन आहे. यामधून मोठा रोजगार निर्माण होतो. परंतु, covid-19 पासून सुरक्षा करता मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले होते. यामध्ये देशभरातून जवळपास दहा हजार थिएटर्स बंद केले गेले होते. ऑक्टोबर 2019 पासून 50% बैठक व्यवस्थेसह सिनेमागृह चालवण्यास परवानगी देण्यात आली. तेव्हापासून आत्तापर्यंत 50% बैठक व्यवस्थेसह थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स हे सुरू आहेत.

थिएटर आणि मल्टीप्लेक्समध्ये बंद वातावरणात कोविड विषाणू पसरण्याची खूप जास्त शक्यता असते. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी, सिनेमागृहामध्ये एक खुर्ची सोडून अशी बैठक व्यवस्थेची परवानगी दिली होती. त्यासोबतच तिकिटांच्या डिजिटल विक्रीसाठीही आग्रह धरला जात होता. मास्क आणि तापमान तपासणी करूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये सोडण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like