“देशातील 130 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी खर्च करावे लागतील 5000 कोटी रुपये”- Zydus Cadila

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । Zydus Cadila चे अध्यक्ष पंकज आर पटेल म्हणाले की,” देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधे साठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.” ते म्हणाले,”भारतातील कोरोना लसीच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी अतिरिक्त सुविधांची आवश्यकता असेल. मात्र फक्त लस हाच कोरोना साथीच्या रोगावरचा एकमात्र उपाय नाही तर आपल्यावर उपचार करण्याचे आणखीही बरेच मार्ग शोधायला हवेत.” पटेल म्हणाले की,” कोरोना लस एक अतिशय कठीण प्लॅटफॉर्म असल्याचे सिद्ध होत आहे, ज्यामुळे ही लस बनविण्याचा खर्चही खूप वाढेल.”

लस हाच एकमेव उपाय नाही
पंकज आर पटेल यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की,” कोरोना साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लस हाच एकमेव उपाय नाही. आपल्याला लस देखील आवश्यक आहे आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार आपल्याला काही नवीन बदल करण्याची देखील आवश्यकता आहे. मला वाटते की, या क्षणी जगभरात या लसवरची चाचणी घेतली जात आहे त्यानुसार, 100% लोकांमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याची अपेक्षा नाही.

5000 कोटी खर्च करावे लागतील
पंकज पटेल म्हणाले की, “भारताला 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी कोरोना लसीला पूरक असा आहार तयार करण्याची गरज भासल्यास उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याची गरज आहे.” झायडस कॅडिलाचे पटेल पुढे म्हणाले की,” कोरोना लस तयार करण्याची प्रक्रिया खूप जटिल आहे, म्हणून इतर लसींपेक्षा ती तयार करण्यास अधिक खर्च करावा लागेल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like