धोनीनंतर रोहित शर्माच सर्वोत्कृष्ट कर्णधार ; दिग्गज भारतीय खेळाडूने केले रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने काल कोलकाताचा पराभव करून आयपीएल 2020 मधील आपला पहिला विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा ला त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला. 196 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची दमछाक झाली. गोलंदाजांचा योग्य रीतीने वापर करून रोहितने पुन्हा एकदा आपलं नेतृत्व कौशल्य दाखवून दिले. यामुळेच भारताचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग रोहित शर्माच्या नेतृत्वावर फिदा झालाय. सेहवागने रोहितच्या नेतृत्वाची स्तुती केली.

रोहितच्या नेतृत्वावर सेहवागने स्तुतिसुमने उधळली, सेहवाग म्हणाला, “मी नेहमीच म्हणतोय की महेंद्रसिंग धोनीनंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम कर्णधार हा रोहित शर्माच आहे. सामना आणि खेळ समजून घेण्याची त्याची क्षमता उत्तम आहे. खेळाच्या गरजेनुसार तो गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जे बदल करतो ते एक उत्तम कर्णधारच करू शकतो”, असे सेहवाग म्हणाला.

कोलकाताविरूद्धच्या सामन्यात नितीश राणा आणि कार्तिक खेळत असताना रोहितच्या जागी दुसऱ्या एखाद्या कर्णधाराने कृणाल पांड्याला गोलंदाजी दिली असती आणि तो निर्णय कदाचित चुकीचा ठरला असता. पण रोहितने त्यावेळी गोलंदाजीसाठी कायरन पोलार्डला आणलं. त्याने अनुभवाच्या बळावर धावगतीवर अंकुश लावला. असेही सेहवाग म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like