न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार ब्लूबेरीचे आहेत ‘हे’ 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । ब्लूबेरी या फळाचे अनेक गुणधर्म आहे. ब्लूबेरीचे या फळाला अँटिऑक्सिडंट चा राजा म्हंटले जाते. ब्लूबेरी एक पॉवरहाऊस फळ आहे, ज्याच्यामुळे अनेक प्रभावी फायदे होतात. ब्लूबेरीचे या फळाचे उत्पन्न हे ठराविक हंगामात होत असते. ब्लूबेरीचे फळाचा वापर मोठ्या प्रमाणात नाश्ता , आहार, ज्यूस मध्ये केला जातो. त्याचे अनेक फायदे आहेत.

ब्लूबेरी या फळामध्ये मोठया प्रमाणात पोषक-समृद्ध असतात. एक कप ब्लूबेरी मध्ये ८५ कॅलरीज , १ ग्रॅम प्रोटिन्स ,त्याच्यामध्ये फॅट चे कोणतेच प्रमाण नसते. तसेच २० ग्रॅम कार्बोहायड्रेटस आणि ४ ग्रॅम फायबर याचे प्रमाण असते. त्याच्यामध्ये त्वचेला चमक मिळण्यासाठी चे घटक असतात. तसेच ब्लूबेरी च्या माधमातून पाण्याची कमतरता भरून निघते. ब्लूबेरी मध्ये असलेले घटक हे मजबूत हाडे करण्यास मदत करते. ब्लूबेरीमध्ये वृद्धत्वविरोधी काम करण्यास मदत करते. आणि रोग संरक्षण शक्तीचा समावेश त्याच्यामध्ये आहे.

एका रिसर्च मधून समोर आले आहे कि, ब्लूबेरी हे असं फळ आणि भाजी आहे कि त्याच्यामध्ये सर्वात जास्त अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे त्याचा रँक सर्व फळांमध्ये नंबर वन वर लागतो. यामुळे आपल्या शरीरात असलेला ताण तणाव कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार होत नसतील तर त्यावेळी या फळाचा वापर केला जातो. आपल्या शरीरातील DNA डॅमेज झाले असेल तर त्यापासून बचाव करण्याचे काम ब्लूबेरी हे करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like