Wednesday, March 29, 2023

पेट्रोल डीझेल दरात पुन्हा वाढ

- Advertisement -

नवी दिल्ली | सौदी आरमॅको कंपनीच्या विहीरींवर ड्रोन हल्ला झाल्यामुळे कंपनीने उत्पादन निम्मे केले आहे. त्याचे परिणाम भारतावर सुरू झाले आहेत. पेट्रोल-डिझेच्या दरात वाढ सुरू झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीचे पडसाद भारतात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात सलग दोन दिवसात प्रतिलिटर साधार २५ ते ३० पैसे वाढ झाली आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेण्ट क्रूड ऑइलची किंमत मंगळवारी प्रतिबॅरल (१५९ लिटर) ६९ अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली. याचा फटका बहुतांश देशांतील इंधनदरांना बसला आहे. त्यात भारताचा क्रमांक आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी इंधनदरात वाढ घोषित केलीआहे. यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ७८.१० व ६९.०४ रुपयांवर पोहोचले. तर, दिल्लीमध्ये हे दर अनुक्रमे ७२.४२ व ६५.८२ रुपये नोंदवले गेले.