व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“प्रदूषण मुक्त भारत साठी कर्वे समाज कार्य महाविद्यालयाचा पुढाकार : पुणे व पिंपरी –चिंचवड शहरातील सिग्नल्सवर ठिकठिकाणी जनजागृती

पुणे प्रतिनिधी | सुनिल शेवरे

शहरातील चार चाकी, दुचाकी व अवजड वाहनांचे वाढते प्रमाण व त्यामुळे भेडसावणारी प्रदूषनाची भीषण समस्या यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे एक नवीन तंत्रज्ञान कर्वे समाज सेवा संस्थेच्या रिसर्च व कन्सल्टंशी विभागाने कमिन्स ग्रुप इंडिया कंपनीच्या मदतीने विकसित केले असून इंधनाचा अपव्यय टाळीत प्रदूषण मुक्त भारत साठी गेल्या आठवडाभर समाजकार्य कमहाविद्यालयाचे विद्यार्थी पुणे” व पिंपरी –चिंचवड परिसरातील महत्वाच्या सिग्नल्स वर उभे राहून लोकांना यासंबंधी जागृत करण्याचे काम करीत आहेत.

पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत्या वाहनांचे प्रमाण व त्यामुळे होणार्या धुराच्या प्रदूषणामुळे पुणेकर श्वसानाच्या विविध आजारांना बळी पडत असून या भीषण समस्येवर एक शास्वत व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रथम वाहन चालकांनाच योग्य ते प्रशिक्षण देऊन हे प्रदूषण टाळत इंधनाची देखील बचत करण्यासाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या रिसर्च व कन्सल्टंशी विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी प्रथम वाहनचालकांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले तर गेल्या आठवडाभरापासून ते पुणे पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ठिकठिकाणी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. या उपक्रमाचा फायदा बहुतांशी वाहनचालकांना होत असून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी व इंधनाचा अपव्यय देखील टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा सर्व वाहनचालकांना व परिणामी पुणेकरांना होत असल्याची भावना पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी व वाहनचालक यांनी व्यक्त केली आहे.

कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, डॉ. चित्रलेखा राजुस्कर, कमिन्स ग्रुप इंडिया चे व्यवस्थापक सचिन वाघ, उप महाव्यवस्थापक महेश बिराजदार, मानवसंसाधन अधिकारी शलाखा भोसले, कार्यक्रम अधिकारी रुपेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालयाच्या मानव संसाधन विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकानच्या सिग्नल्स वरील वाहनचालकांना लाल सिग्नल सुरु असताना पुढील हिरवा सिग्नल चालू होईपर्यंत दुचाकी- चारचाकी बंद करून इंधनाचा अपव्यय टाळून कशापद्धतीने आपण कार्बन डाय ओक्साईड व इतर घातक घटकांपासून फुफ्फुसांचे किंवा श्वसनाचे आजार टाळू शकतो तसेच सर्वच प्रकारचे प्रदूषण देखील टाळले जाऊ शकते शिवाय इंधनाची देखील बचत करू शकतो यासंबंधी सिग्नल असतानाच्या काळात विविध पोस्टर्स द्वारे तसेच वैयक्तिक मार्गदर्शन करून प्रबोधन व जनजागृती करण्याचे काम केले.