भारतीय वायुसेनेनं दिल्या नवर्षाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा; व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या भावना    

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । जगभरासोबत भारतात नवीन वर्ष साजर होत आहे. प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत आहेत. राजकारणी, खेळाडू, सिने अभिनेते असे विविध सेलिब्रिटी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना भारतीय वायुसेना सुद्धा यात मागे राहिली नाही आहे. भारतीय वायुसेनेनं एका आगळया-वेगळया पद्धतीनं आनंद व्यक्त करत देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवर एक थरारक विडिओ जारी करत भारतीय वायुसेनेनं देशवासियांना नवीन वर्षांचा संदेश दिला आहे. ”छोट वादळ पाहून तुम्ही घाबरु शकता पण आमच्यासाठी नसानसात भिनलेल्या देशभक्तीसमोर हे वादळ काहीच नाही. जेव्हा मी देशासाठी लढत असेन तेव्हा माझ्या चेहऱ्यावर अभिमानाचे स्मितहास्य आणि शत्रूला संपविण्याची जिद्द असेन.” अशा शब्दांत वायुसेनेनं आपले शौर्य, देशाप्रती आपले समर्पण आणि कर्तव्याची जाणीव व्यक्त करत देशातील नागरिकांना त्यांच्या संरक्षण करण्याचा विश्वास दिला.

 

 

Leave a Comment