बाईक चालवण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, सरकारच्या आदेशानंतर आता बदलले टू-व्हिलरचे नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार रोड सेफ्टीसाठी नियमांमध्ये बदल करत आहे. या नियमांत आता दुचाकीसाठी हँडहोल्ड आणि साईड गार्ड लावण्यास सांगितले आहे. बाईकवर मागे कंटेनर ठेवण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचनाही यामध्ये जारी केलेल्या आहेत.

केंद्र सरकार रोड सेफ्टीसाठी सतत चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असते. हेच कारण आहे की, याच्या काही नियमांमध्ये बदल केले जात आहेत. नुकतेच मंत्रिमंडळातील New Guidelines for two wheeler शनिवारी लोकांसाठी आणल्या गेल्या आहेत.

मागील एका मार्गदर्शकामध्ये सांगण्यात आलेले होते कि, दुचाकीच्या मागे दोन्ही बाजूला हँडहोल्ड असला पाहिजे. याचा उद्देश मागे बसलेल्यांची सेफ्टी राखणे हे आहे. सध्याच्या दुचाकींमध्ये हि सुविधा नाही आहे. त्यासोबतच दुचाकीच्या मागे बसणार्याच्या दोन्ही बाजूला पायदान असले पाहिजे.

या मार्गदर्शकामध्ये सांगितले गेले की, दुचाकीच्या मागील बाजीचा अर्धा अधिक भाग हा कव्हर केलेला असला पाहिजे जेणेकरून मागे बसल्याचे कपडे त्यात अडकणार नाही.

परिवहन मंत्रालयाने दुचाकीवर हलका कंटेनर बसण्याविषयीही मार्गदर्शका जारी केला आहे. या कंटेनरची लांबी 550 मि.मी, रुंदी 510 मिलीमीटर आणि उंची 500 ​​मीटरपेक्षा जास्त नसावी. जर कंटेनरला मागील बाजूस बसवले गेले तर फक्त ड्रायव्हरलाच प्रवास करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ असा की दुसरा व्यक्ती दुचाकीवर बसू शकत नाही.

नुकतेच सरकारने टायरविषयीची नवीन मार्गदर्शक सूचना देखील लागू केली आहेत. ज्यामध्ये 3.5 पेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसवण्याची सूचना दिली आहे.

या सिस्टीमच्या सेन्सरमुळे ड्रायव्हरला माहिती मिळते की, गाडीच्या टायरमध्ये हवेची स्थिती काय आहे. त्याच्याबरोबरच टायर किटची देखील सूचना करण्यात आलेली आहे. याच्या अंमलबजावणी नंतर गाडीमध्ये एक्स्ट्रा टायरची आवश्यकता भासणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like