लुंगी नेसून ट्रक चालवल्यास २००० रुपये दंड; सरकारचा अजब नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था  | देशभरातील ट्रक चालकांचा आवडता पोशाख म्हणजे लुंगी. लुंगी घालून ट्रक चालवण्यात त्यांना आरामदायक वाटते. मात्र, या पुढे आपल्या आवडत्या पेहरावात ट्रक चालवणे चालकांना फारच महागात पडू शकते. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात अशा पेहरावात ट्रक चालवणाऱ्यांवर कारवाई करत चालान कापले जात आहे. लुंगी घातल्याने चालकांना २००० रुपये द्यावे लागत आहेत.मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींनुसार, चालकांना ड्रेस कोडचे पालन करावे लागते. मात्र, आतापर्यंत हा नियम काटेकोरपणे लागू करण्यात आलेला नव्हता. आता मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे.

नव्या नियमावलीनुसार, फुल पँट आणि शर्ट किंवा टीशर्ट घालूनच आता गाडी चालवावी लागणार आहे. या व्यतिरिक्त आता चप्पल, सँडल घालूनही गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. गाडी चालवण्यासाठी बूट घालणे गरजेचे आहे. नव्या तरतुदींनुसार, हा नियम स्कूल बसच्या चालकांनाही लागू झाला आहे. स्कूल बसच्या चालकांनाही ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे.

Leave a Comment