खानापुरात लढण्यासाठी कॉंग्रेसकडून नवीन उमेदवार मैदानात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संगली प्रतिनिधी | विटा-महाराष्ट्र राज्य कामगार काँग्रेसचे(इंटक)चे उपाध्यक्ष रवींद्र लक्ष्मणराव भिंगारदेवे हे खानापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी करण्याच्या मनस्थितीत आहेत. भिंगारदेवे हे माजी आमदार ऍड लक्ष्मणराव तात्या भिंगारदेवे यांचे सुपुत्र आहेत.

तात्यासाहेब भिंगारदेवे हे मातंग समाजातील पहिले आमदार आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लाडके विद्यार्थी होते. १९३७ पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते. १९४६ साली त्यानी बार्शी या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. १९५२ साली खानापूर मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून ते निवडून आले.१९६२ साली त्यानी माणमधून विजयी मिळवला. त्याच तात्यासाहेब यांचे सुपुत्र रवींद्र नाना यांनी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना “आम्ही पक्ष सोडणार नाही. आम्ही पक्ष उभा करू, लढू.” असा विश्वास व्यक्त करत तात्यासाहेबांचा पक्षनिष्ठतेचा तेजस्वी वारसा जिवंत ठेवण्याचा निर्धार केला आहे.

खानापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार सदाभाऊ पाटील हे काँग्रेसकडून लढणार नाहीत हे नक्की आहे.कारण त्यांनी मुलाखतही दिलेली नाही. त्यामुळे या जागेवर कोण लढणार असा प्रश्न निर्माण झाला असताना रवींद्र भिंगारदेवे पुढे आले आहेत.राज्यभर पतसंस्था डबघाईला गेल्या असताना त्यानी एक पतसंस्था चांगली चालवून सहकारात आदर्श निर्माण केला आहे. त्यानी सुमारे पस्तीस वर्षं पत्रकारिता केली आहे. सोबत पत्रकार घडवण्याचे काम केले आहे.खानापूर तालुक्यात राजकीय वर्तुळात एक अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘या’ आमदाराच्या विरोधात बॅनरबाजी

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

तर मी खासदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल : खासदार अमोल कोल्हे

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

Leave a Comment