विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल १० ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं. तसंच परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

विद्यार्थ्यांना प्रश्नसंच, मॉक टेस्ट यानंतर काही कारणास्तव परीक्षा राहिल्या तर त्या तातडीनं घेण्यात येतील. नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीनं महिन्याभरात घेतली जाईल आणि त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल,” असं सामंत यांनी स्पष्ट केलं. “पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही. गेल्यावर्षीप्रमाणेच हे प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.

उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे –

1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार

-11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार

-निकालावर कोणताही शेरा लागणार नाही

-1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल

  • विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये

-तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू

दरम्यान, कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांची मोठी समस्या  झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रमाणपत्रावर कोविड-19 असा उल्लेख नसणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like