Thursday, March 23, 2023

सुशांत प्रकरणाला बिहार निवडणुकीचा मुद्दा बनवणार नाही पण न्याय मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही- फडणवीस

- Advertisement -

पाटणा । बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आज पाटण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर बिहार विधानसभा निवडणुक लढणार का? असा सवाल फडणवीस यांना केला असता त्यांनी यावर सूचक वक्तव्य केलं आहे. सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली. आत्महत्या प्रकरणाला बिहार निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची भाजपची इच्छा नाही. पण जोवर सुशांतला न्याय मिळणार नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. पहिल्यांदा भाजपच्यावतीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर निवडणूक मुद्द्याच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.