हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दिवंगत भाजप नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री आणि दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज तसेच माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच बरोबर दिवंगत कामगार नेते आणि माजी मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना देखील मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रिकेटपट्टू झहीर खान, अभिनेत्री कंगना रानौवत, दिग्दर्शक करण जोहर, ऐकता कपूर, सरिता जोशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
बॅडमिंटनपट्टू पीव्ही सिंधू, उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.