ठाणे प्रतिनिधी । सतत पडत असलेल्या पावसाने राज्यभरातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ग्राहक नसल्याने एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला पडून असल्याचे चित्र आहे. शनिवारी नेहमीच्या किंमतीपेक्षा भाज्यांचे दर 50 टक्के खाली उतरल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळालं. नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 700 आणि शनिवारी 650 गाड्यांची आवक झाली आहे.
दिवाळी असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला काढला नव्हता. अशातच सततच्या पावसाने हा न काढलेला भाजीपाला शेतातच खराब होऊ लागला. बाजारपेठेत आलेली भाजी खराब असल्याने याचा परिणाम एकूण भाजीविक्रीवर होत आहे. 50 टक्के भाजी पडून असल्यामुळे भाज्यांचे भाव 40 टक्के उतरले आहेत. पालेभाज्यांच्या किंमती मात्र नेहमीपेक्षा वाढलेल्या असल्याचं पाहायला मिळालं. भाजीपाल्यांचे दर पुढीलप्रमाणे –
कोबी – 12 रुपये किलो, फ्लॉवर- 8 ते 11 रुपये किलो, टोमॅटो- 25 रुपये किलो, गवार – 40 रुपये किलो, कारली – 12 रुपये किलो, कोथंबीर – 30 ते 40 रुपये जुडी, मेथी- 30 रु जुडी, पालक- 10 रुपये जुडी, कांदापात – 20 रुपये जुडी.