कलम ३७० वरून आणखी एका जिल्हाधिकाऱ्याचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | दक्षिण कन्नड जिल्ह्यात उपायुक्त पदाची जबाबदारी सांभळणाऱ्या सेंथिल यांनी आपला राजीनामा देताना लिहिलं, “सध्या जे घडतंय अशा परिस्थितीमध्ये माझ्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणं अनैतिक ठरेल, कारण सध्या आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीच्या मुल्यांशी तडजोड केली जातेय.” 40 वर्षांचे शशिकातं कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

यूपीएसी परिक्षेत ते तामिळनाडूचे टॉपर होते तर देशात त्यांचा 9 वा रँक होता.एस. शशिकांत सेंथिल यांनी तिरुचिरापल्लीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. याआधी ते 2009 ते 2012 पर्यंत कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये सहायक आयुक्त या पदावर कार्यरत होते.

या दरम्यान त्यांनी दोनदा शिवमोगा जिल्हा परिषदेच्या सीईओची जबाबदारी स्वीकारली होती. ”मी हा निर्णय घेतला कारण मला वाटतं की या परिस्थितीत, देशात जे घडतंय ते पाहाता, आपल्या समृद्ध लोकशाहीच्या मुल्यांशी तडजोड केली जात असताना मी प्रशासकिय अधिकारी म्हणून काम करणं अनैतिक ठरेल.मला हेही वाटतं की येता काळ देशासाठी आणखी संकट घेऊन येईल. म्हणूनच मी माझं काम चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रशासकिय सेवेतून बाहेर पडणं योग्य ठरेल.” असे सेंथिल यांनी स्पष्ट केले

Leave a Comment