खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प रहायचं हे कितपत योग्य- अशोक सराफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी। राज्यात शहरी तसेच इतर भागातील रस्त्यामधील खड्यांमूळे सामान्य नागरिकांन पासून कलावंतांना सुद्धा त्रास होत आहे. प्रशांत दामले, पुष्कर क्षोत्री या मराठी कलावंतांनी रस्त्यावरील खड्डयांबाबत आपले खडे बोल सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. याच विषयाला धरून लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी वक्त्यव्य केले.

अशोक सराफ म्हणतात की, ‘रस्त्यावरील खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प रहायचं हे कितपत योग्य आहे हा विचार करणारा प्रश्न आहे. असेच चालू राहल्यास हा प्रश्न कधी सुटणार नाही’,असे मत अशोक सराफ यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले . ते काल नागपुरात बोलत होते.

 

‘राजकारणासोबत माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही जे मला जमत नाही त्यात मी कधी जाणार नाही.  मी नाटकात कधी राजकारण केल नाही आणि राजकारणामध्ये नाटक करणार नाही त्यामुळे  “पोलिटिक्स से हाय तौबा..” असं बोलत अशोक सराफ यांनी आपली मते मांडली.

Leave a Comment