खासदार नवनीत राणा, राज्यमंत्री बच्चू कडूंचा सायकल रॅलीत सहभाग; पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा दिला संदेश, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी, आशिष गवई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या त्यांच्या हटके शैलीसाठी नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये त्या सायकल चालवताना दिसत असून त्यांनी या माध्यमातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश अमरावतीकरांना दिला आहे. खासदार नवनीत राणा यांच्यासोबत राज्यमंत्री बच्चू कडू तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या देखील सायकल रॅलीत सहभागी झाल्या.

नवनीत राणा सायकल चालवत असताना म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नागरिकांना दुचाकी चारचाकी तसेच प्रदूषण करणाऱ्या घातक डिझेल वाहनांमुळे विविध आजार जडलेले असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रदूषणावर जर नियंत्रण मिळवायचे असेल तर प्रत्येकाला सायकल चालवून पर्यावरणाचा समतोल राखावा लागेल तरच आपल्याला स्वस्थ जीवन,  स्वच्छ हवा मिळू शकेल असा संदेश नवनीत राणा यांनी नागरिकांना दिला.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सायकल चालवून आरोग्य, पर्यावरण आणि ईंधन संरक्षणाचा संदेश दिला. अमरावती शहरात पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा क्रीडा संकुलात सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी विजेत्यांना ११ सायकली बक्षिस देण्यात आल्या.

म्हणुन नवणीत राणा यांनी चालवली सायकल | Navneet Rana

 

Leave a Comment