छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर करत कंगनाने केलं मराठीत ट्विट, म्हणाली..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कंगनाने स्वतःला झाशीची राणी दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचा फोटो शेअर करत मराठीत ट्विट केलं आहे. ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन’, असं कांगनानं मराठीत ट्विट करत म्हटलं आहे.

कांगनानं ट्विटसोबत शेअर केलेल्या फोटोत छत्रपती शिवाजी महाराज कंगनाच्या हाती तलवार देताना दाखवलं आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी तिला हा फोटो पाठवल्याचं कंगनाने ट्विटमध्ये सांगितलं. ‘अनेक मीम्स मला मिळाले. हा एक फोटो मला माझे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवला. हा फोटो पाहून मी भावूक झाले. राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद जय महाराष्ट्र’, असं तिने मराठीत लिहिलं.

दरम्यान, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर अशी उपमा देणारी कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment