मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाची चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांत खातेवाटप होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. खातेवाटपामध्ये जयंत पाटील यांच्याकडे असणारे अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनिल देशमुख यांना गृह खाते देण्यात येणार असल्यामुळे अजित पवार यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांच्याकडील अर्थ खाते काढून अजित पवार यांना दिले जाऊ शकते. अजित पवारांना अर्थ व नियोजन खाते मिळू शकते. जयंत पाटील यांना जलसंपदा खाते मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खात दिलं जाणार आहे. काँग्रेस महसूल खात्याबरोबरच अजून एक महत्वाचे खाते देण्याची मागणी करत आहे. आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खाते दिले जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खाते कायम राहील.
पहा संभाव्य खातेवाटप
जयंत पाटील – जलसंपदा
अजित पवार – अर्थ व नियोजन
आदित्य ठाकरे – पर्यावरण
एकनाथ शिंदे – नगरविकास
अनिल परब – मुख्यमंत्री कार्यालय
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
गुलाबराव पाटील किंवा दादा भुसे – कृषी खाते