उस्मानाबाद प्रतिनिधी । उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळ सर्वत्र डास वाढले असून डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढलेत. हे आजार नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सरकारने जवळपास २०० कोटी खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यन्वित केली. मात्र तरीही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. शिळे पाणी वापरल्याने नागरिक आजारी पडत आहेत. असा आरोप करत काँग्रेस पक्षातर्फे महानगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. निवेदनावर जर गांभीर्याने विचार केला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.
शहरातील सर्वच भागात डास वाढल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बऱ्याच भागात कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान अचानक डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले असून सरकारी आणि खाजगी रुग्णालयातही रुग्णसंख्या वाढलीये.
डेंग्यू हा नोटीफाईड आजार असून खासगी रुग्णालयांनी या आजाराच्या प्रत्येक रुग्णांची माहिती महापालिकेला कायद्याने देणे बंधनकारक आहे. परंतु अद्याप खासगी रुग्णालयांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे.या रुग्णालयांवर कारवाई होणार काय? असा प्रश्नही काही नागरिकांनी उपस्थित केलाय.