ताडोबात पर्यटकांनी वाघिणीसह बछड्यांचा मार्ग रोखला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर | विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आणि वाघोबा हमखास दिसण्याचे एकमेव स्थान ताडोबा आहे. यामुळे ताडोबात पर्यटकांची गर्दी असते. वनविभाग पर्यटनटून कोट्यधी महसूल कमवीत असेल मात्र वन्य प्राण्याच्या सुरक्षेवर दुर्लक्ष आहे. असाच प्रकार रविवारी घडला. ताडोबातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या माया वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग पर्यटकांनी रोखल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत होती. यावेळी अत्यंत संथ गतीने आपल्या पिलांसह रस्त्याने जाणाऱ्या वाघिणीच्या पुढे जिप्सी नेत मार्ग रोखल्या गेला.

ताडोबात कुठलाही प्राणी पाहताना सुरक्षित अंतर राखणे फार आवश्यक आहे आणि त्या प्राण्याच्या रस्त्यात आपली गाडी अडथळा ठरू नये असं देखील पहावे लागते. मात्र या व्हिडीओत पर्यटक दोन्ही बाजूला रस्ता बंद करून उभे असल्याचे दिसून येत आहे

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सध्या दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पर्यटकांनी फुलून गेला आहे. मात्र सोशल मीडियावर वायरल झालेल्या काही दृश्यात पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नियम धुडकावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचे या दृश्यात दिसत आहे. हा प्रकार चुकीचा असून ताडोबातील व्यवस्थापनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे. अशा पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment