थेट नगराध्यक्ष निवडीला महाविकास आघाडीचा ब्रेक; सरपंच, नगराध्यक्ष सदस्यांतून निवडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे थेट नगराध्यक्ष निवड रद्द करून पूर्वीची सदस्यांमधून निवड पुन्हा चालू करण्याचा निर्णय मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस सरकारने थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. तो निर्णय आता ठाकरे सरकारने रद्द केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे घेतलेल्या बैठकीत थेट सरपंच निवड रद्द करण्याचे संकेत या आधीच दिले होते. आता सरपंचापाठोपाठ नगराध्यक्षही सदस्यांमधून निवडून येणार आहेत.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते.

या बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसुदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.’

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloNews”

पहा – www.hellomaharashtra.in

इतर महत्वाच्या बातम्या –

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा एतिहासिक निकाल

Leave a Comment