टीम हॅलो महाराष्ट्र : राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांची मनःस्थिती समजू शकतो, त्यांना दुसरं काही काम नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे.. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
यानंतर जयंत पाटील यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटतात काहीही अडचण नाही. मुख्यमंत्री खातेवाटप लवकरच जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.”
वस्तू आणि सेवा कराविषयी (जीएसटी) देखील बैठक झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. जीएसटीचे उत्पन्न घटल्याने केंद्राकडून यायला हवा तो निधी येत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. तसंच पीएमसी बँकेचं विलीनीकरण राज्य सहकारी बँकेत करता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं.