दोन हजार किलो मासळी जप्त, केरळच्या मत्स्य विभागाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी | केरळमधील घुसखोर पर्ससीन ट्रॉलर्सवर मत्स्य विभागाच्या अधिका-यांनी केलेल्या कारवाईत सुमारे दोन हजार किलोंची मासळी जप्त करण्यात आली आहे. मरिन अ‍ॅक्ट अंतर्गत रत्नागिरी तहसीलदार यांच्याकडे दंडात्मक कारवाईसाठी ही केस पाठवण्यात आली.

मिरकरवाडा बंदरापासून अवघ्या काही अंतरावर केरळमधील ट्रॉलर्स पकडण्यात आला. या ट्रॉलर्समध्ये तब्बल १६ खलाशी होते. तसेच बोटीवर एलईडी लाईट आणि जनरेटरची व्यवस्था देखील करण्यात आली होती. जिल्ह्याच्या हद्दीत एलईडी मासेमारीला बंदी असताना बोटीवर एलईडी लाईट सापडल्याने केंद्राच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मत्स्यच्या अधिका-यांनी सांगितले.

बोटीवरील जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने ही बोट मिरकरवाडा बंदरापासून अवघ्या काही अंतरावर उभी होती. केरळमधील पर्ससीन नौका मिरकरवाडा बंदरानजीक असल्याची माहिती येथील स्थानिक मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी दिली. पालव यांनी परवाना अधिकारी संतोष देसाई, जीवन सावंत, मिरकरवाडा प्राधिकरणाचे वि. बा. काळे यांच्यासह मिरकरवाडा बंदरावर धाव घेतली. समुद्रात असलेली नौका मिरकरवाडा बंदरावर आणण्यात आली. यावेळी बोटीवरील असलेल्या साहित्याचा पंचनामा करण्यात आला.

तसेच बोटीतील मासळीची मोजदाद करण्यात आली. यावेळी बोटीवर सुमारे दोन हजार किलो मच्छी असल्याचे दिसून आले. बोटीवर असलेली मासळी जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार मासळी लिलावासाठी बोली लावण्यात आली. १५६ रुपयांचा दर प्रतिकिलो याप्रमाणे लिलाव करण्यात आला. तसेच बोटींवरील १६ खलाशांना ताब्यात घेण्यात आले. मरीन अ‍ॅक्ट अंतर्गत बोटीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

Leave a Comment