अमरावती प्रतिनिधी | भुसावळकडून वर्ध्याकडे जाणाऱ्या एका मालवाहू रेल्वे गाडी समोर उभे राहून एक २५ वर्षिय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानका जवळ घडली आहे. निर्भय शिंदे वय (२५) रा. धामणगाव रेल्वे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत निर्भय हा स्टेशन जवळून काही अंतरावर असलेल्या रुळावर आत्महत्या करण्यासाठी उभा होता. यावेळी भुसावळवरून वर्ध्याकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वेने निर्भयला जोरदार धडक दिली. या धडकेत इंजिनच्या चिमट्यात निर्भय अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने इंजिनमधील चिमट्यातुन निर्भयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृतदेह बाहेर काढेपर्यंत म्हणजे १५ मिनिटे मालगाडी थांबवून ठेवावी लागली होती. निर्भयने आत्महत्या का केली याच कारण अद्याप समजू शकले नाही. निर्भयाचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेत धामणगाव रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.