निजामुद्दीन प्रकरणावरुन स्वरा भास्कर अन् बबिता फोगट यांच्यात जुंपली! पहा कोण काय म्हणाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची स्टार रेसलर बबीता फोगट तबलीगीबाबत वादग्रस्त विधान करून अडचणीत आली आहे.बबीताने देशातील झपाट्याने होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाला तबलीगी जमात जबाबदार असल्याचे सांगताना आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यानंतर लोक दोन गटांत विभागले गेले आहेत. एक गट तिच्या समर्थनात पुढे आला आहे तर दुसरा गट तिला विरोध करीत आहे.यादरम्यानच,अभिनेत्री स्वरा भास्कर आणि बबीता फोगट यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.वास्तविक स्वराने काही आकडेवारी शेअर केली आहे आणि त्यावर बबिताला यावर कमेंट करण्यास सांगितले. त्यानंतर बबिताने स्वारालाही अशाच प्रकारे प्रतिक्रिया दिली.

खरं तर, बबिताने काही दिवसांपूर्वी तबलीगीबाबत वादग्रस्त भाष्य केले होते, त्यानंतर तिला सोशल मीडियावर धमक्या आणि शिव्या देण्यात येऊ लागल्या. यानंतर, शुक्रवारी २०१० राष्ट्रकुल खेळातील सुवर्णपदक विजेती बबिताने एक व्हिडिओ शेअर केला आणि धमकी देणाऱ्या लोकांना इशारा दिला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

स्वराने एका युझर्सचे ट्विट शेअर केले आणि बबिताला हा आकडा बघायला सांगितले.ती म्हणाली की ही आकडेवारी पाहिल्यानंतर तिने यावर बोलायला हवे. त्याचवेळी स्वरा भास्करने बबीताला दिल्ली पोलिसांनी परवानगी का दिली असा प्रश्न उपस्थित करण्यास सांगितले.

 

आपल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रात कुस्तीपटू बबिताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविल्याचा आरोप करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात बबिता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव झाली आहे.गेल्या काही दिवसांत तिने अशी दोन ट्वीट केली होती, त्यामुळे बरीच खळबळ उडाली होती. ज्या ट्वीटवरून सध्या वाद सुरु आहे ते १५ एप्रिलचे आहे, ज्यात ती म्हणालेली की कोरोनाव्हायरस ही भारताची दुसरी मोठी समस्या असून तबलीगी जमात ही पहिल्या क्रमांकावर आहे.तिच्या या ट्विटला अनेक लोकांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीही बबितानेही असेच एक वादग्रस्त ट्विट केले होते, ट्विटरच्या नियमांमुळे हे ट्विट तिच्या खात्यातून काढून टाकले गेले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment