टीम हॅलो महाराष्ट्र : भावना सर्वांना असतात. अगदी लहान मुलांना देखील. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मंगेशने देवाघरी गेलेल्या त्याच्या वडिलांवर निबंध लिहिला आहे. मंगेशच्या वडिलाचा टी.बी झाल्यामुळे 18 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूमळे दुःखी झालेल्या मंगेशने त्याच्या भावना निबंधातून व्यक्त केल्या आहेत. 9 जानेवारी रोजी लिहिलेला हा निबंध सोशलमीडियावर व्हायरल होत असून वाचणारा प्रत्येकजण निःशब्द होतोय. प्रत्येक संवेदनशील माणसाचे डोळे पाणावले जात आहेत. निबंधातून मंगेश काय म्हणतोय. वाचा सविस्तर.
माझे पप्पा
माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पपाचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टी.बी. झालेला होता. म्हणून मला माझ्या मम्मीने मामाच्या गावी पाठवले होते. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंड्याच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे, वही पेन आणायचे. माझे लाड करायचे.मला माझे पप्पा लई आवडत होते. पप्पा 18 डिसेंबरला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाहुणे आले होते. माझे पप्पा मायाळू होते. पप्पा म्हणायचे तू साहेब हो, अभ्यास कर. मला पप्पाची आठवण येते. आम्हाला रात्री चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या.