पुणे प्रतिनिधी | मयुर डुमने
३डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पुणे महानगर पालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘जागतिक अपंग दिन’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक आणि प्रहार चे प्रसिद्धी प्रमुख रफीक खान यांनी दीपप्रज्वलन करून केले.
या वेळी मुक्ता टिळक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ” पालिका दिव्यांगांच्या प्रत्येक समस्यांचे बारकाईने निरीक्षण करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करील व दिव्यांगांना शहरात फिरत असताना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेण्यात येईल.” प्रहार चे प्रसिद्धि प्रमुख रफीक खान म्हणाले की, “आपण फ़क्त शारिरिक दृष्टया अपंग आहोत. आपली मानसिकता व विचार अपंग नाहीत. आपण स्वतः ला अपंग समजू नये, जो मनुष्य आपल्या कमतरतेला घाबरून आत्मविश्वास गमावून गुडघे टेकुन रडत बसतो त्याला कुणीही उभे करु शकत नाही. जो आपल्या कमतरतेला आपली ताकद बनवतो व आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतो त्याला त्याच्या पायांवर उभे राहण्यासाठी कुणी ही अडवु शकत नाही. अपंगांसाठी असणाऱ्या सरकारच्या योजना जरी कागदांवर असल्या तरी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्यालाच हात पाय मारावे लागणार”.यावेळी पालिकेच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती देखील दिली.कार्यक्रमाची सांगता अंध कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा ने करण्यात आली.
या प्रसंगी पालिकेचे उपायुक्त नितिन उदास ,समाज विकास चे रामदास चव्हाण,मुकुंद महाजन,डॉक्टर गागरे,तहसीलदार श्रीधर भालेराव , प्रहार चे शहर अध्यक्ष अभय पवार,सुनंदा बामणे,सुखदेव तांबे, गोविन्द वाघमारे, मिनाताई धोत्रे, सचिन ओव्हाळ व रामदास म्हात्रे आदि बहुसंख्य दिव्यांग नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.