मुरादाबाद : भारतात जेवढे लोक आहेत, त्या सर्वांचे पूर्वज हिंदू आहेत, त्यामुळे हा देश हिंदूंचा आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या आधीही त्यांनी भारत हा हिंदूंचा देश असल्याचे मत व्यक्त केले होते.
बाहेरून आलेला येथे कोणी नाही. सर्व इथलेच आहेत. जेव्हा संघ हिंदू समाज असं म्हणतो, तेव्हा तो देशातील कोणत्याही भाषेला, धर्माला, प्रांताला वेगळे मानत नाही. समाजातील सर्व घटक काम करणार नाहीत कार्याचे विभाजन होईल. सर्व लोक झोपले तरी ते योग्य नाही.
आम्ही लोक संविधानाला मानतो
मोहन भागवत म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारांवरच हे संविधान उभे राहिले आहे. आम्ही या संविधानाला प्रमाण मानतो. सर्व भारतातील व्यक्तींचे कल्याण झाले पाहिजे या विचाराने आम्ही काम करतो. संविधानात नागरिकांची कर्तव्य आहेत. ती कर्तव्य नागरिकांनी पाळली पाहिजेत.