मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचे ‘हे’ आमदार नाराज; लवकरच राजीनामा देण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरु झालेलं नाराजीनाट्य तिसऱ्या दिवशीही सुरु आहे. कालच पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनात तोडफोड करण्यात आली. आता कोल्हापूरचे काँग्रेस आमदार पी.एन. पाटील मंत्रिपद न दिल्याने नाराज आहेत. लवकरच ते विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या १० आमदारांना स्थान देण्यात आले.

पीएन पाटील हे काँग्रेसमध्ये गेल्या ४० वर्षांपासून सक्रिय आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पीएन पाटील यांना काँग्रेसने मंत्रिपद दिलं नाही. उलट कोल्हापूरमधून सतेज पाटील यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं पीएन पाटील यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Comment