हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी रोजी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचं सांगण्यात आलं आहे.
आम्ही वारीस पठाण यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस बजावली आहे. २९ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून, त्यांना आपले म्हणने मांडण्यास सांगण्यात आले आहे. असे कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम एन नागराज यांनी सांगितलं.
दरम्यान वारीस पठाण यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथील सभेत बोलताना १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कलबुर्गी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.