मातोश्रीला पुन्हा एकदा कोरोनाचा घेराव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सर्व स्तरातील लोक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकाला कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मातोश्रीचे टेन्शन वाढले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगर भागातील ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत १४ दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते. बंगल्याच्या बाहेर असलेल्या चहा विकणाऱ्याला कोरोना झाला होता. मातोश्री वर ड्युटी असलेले कर्मचारी तेथे चहा पिण्यासाठी जात होते त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर सर्वाना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

तेजस ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे चिरंजीव आहेत. त्यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षारक्षकातील ताफयातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेजस यांच्यासह इतर सुरक्षा रक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे. तेजस यांच्यासह इतर सुरक्षा रक्षकांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय बंगला असललेला वर्षा याठिकाणी बंगल्यावर तैनात करण्यात आलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली होती. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment