मुंबईत तुफान पावसामुळे ‘इंडिगो’ ची उड्डाणे लांबणीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुंबईला मागील २ दिवसांत पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुंबई शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं असताना वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचं यानिमित्ताने पहायला मिळालं. रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहून जात असताना रेल्वे सेवा आणि विमान उड्डाणावरही याचा परिणाम झाला आहे. इंडिगो एअरलाईन्स या विमानसेवेच्या मुंबईहून निघणाऱ्या २० हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर २८० फ्लाईट्स नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटणार असल्याची माहिती इंडिगो प्रशासनाने दिली आहे.

मुसळधार पावसामुळे प्रवाशी 3 तास विमानतळावरच अडकून पडले असून संतप्त प्रवाशांनी ट्विटरच्या आधारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दर दिवशी एक हजार विमानाचं उड्डाण होत असतं, परंतु मुंबईतील बदललेल्या पर्जन्यस्थितीमुळे प्रत्येक विमानाचं उड्डाण सरासरी एक तासभर लांबणीवर पडलं आहे. विमानतळ व्यवस्थापनाने मात्र काही तासांमध्येच ही व्यवस्था सुरळीत होईल असा निर्वाळा दिला आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी इंडिगो विमान प्रशासनाने प्रवाशांना घरातून निघण्यापूर्वी विमान उड्डाणाची चालू स्थिती पाहण्यासाठी सांगितलं आहे. येत्या २४ तासांत मुंबईतील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

Leave a Comment